मापनावरील उदाहरणे

शाब्दिक उदाहरणे

views

3:20
शाब्दिक उदाहरणे मुलांनो, आतापर्यंत आपण अनेक वेळा शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास केला आहे बेरीज ,वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांवर आधारित उदाहरणे सोडविली आहेत. तुम्हाला माहीतच आहे की, गुणाकार क्रियेवरील उदाहरणे सोडवताना एकावरून आपण अनेकांची किंमत काढतो. तर भागाकार करताना आपण अनेकांवरून एकाची किंमत काढत असतो. एकूण, मिळून यांसारखे शब्द उदाहरणांत असतील तर आपल्याला कळते की बेरजेचे गणित आहे. तर शिल्लक, बाकी, च्या पेक्षा जास्त किंवा च्यापेक्षाकमी यांसारख्या शब्दांचा उल्लेख असेल तर त्या ठिकाणी आपण वजाबाकी करतो. चला तर मग, आता आपण मापनावरील काही शाब्दिक उदाहरणे सोडवू. उदाहरण 1) एका दुकानदाराने 150 किलोग्रॅम, 500 ग्रॅम तांदळापैकी 75 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकला. तर त्याच्या कडे किती तांदूळ शिल्लक राहिला? मुलांनो, या उदाहरणात किती शिल्लक राहिले असे विचारले आहे. याचाच अर्थ हे उदाहरण वजाबाकीचे आहे. पहा, याठिकाणी 500 ग्रॅम मधून 750 ग्रॅम वजा होत नाहीत. म्हणून 150 किग्रॅ मधून 1 किग्रॅचे रूपांतर ग्रॅम मध्ये केले. म्हणून आता ग्रॅममध्ये 1500 ग्रॅम झाले आहेत. या 1500 ग्रॅम मधून 750 ग्रॅम वजा केले तर 750 ग्रॅम शिल्लक राहिले. आता किग्रॅमधून 1 कमी झाल्यामुळे किग्रॅ मध्ये149 किग्रॅ राहिले आणि त्यातून 75 किग्रॅ वजा केले तर 74 किग्रॅ शिल्लक राहिले. म्हणून 150 किलोग्रॅम, 500 ग्रॅम तांदळापैकी 75 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकला. तर 74 कीग्रॅ 750 ग्रॅम तांदूळ शिल्लक राहिला.