वर्तुळ Go Back त्रिज्या, जीवा, व्यास views 3:36 त्रिज्या, जीवा, व्यास तुम्हाला कागदाचे घडीकाम करून विविध वस्तू बनवण्यास आवडतात का ? म्हणजे होडी, आकाशकंदील? आज आपणही एक लहानशी घडीकामाची कृती करणार आहोत. तुम्हीही माझ्यासोबत करा. यासाठी एका घोटीव कागदावर कोणतीही एक गोलाकार वस्तू ठेवून पेन्सिलच्या साहाय्याने त्याची बाह्यरेषा आखून घ्या. आता कैचीच्या सहाय्याने तेवढा भाग कापून घ्या. नंतर या मिळालेल्या वर्तुळाकार कागदाचे २ समान भाग होतील अशी एक घडी घाला. पुन्हा तयार झालेल्या अर्धवर्तुळाकाराचेही दोन भाग होतील अशी घडी घाला. (चित्र). आता दुमडलेल्या घड्या मोकळ्या करा. आणि काय दिसते ते पहा. घडीमुळे वर्तुळाकार पडलेल्या दोन रेषांचे निरीक्षण करा. दोन रेषा ज्याठिकाणी एकमेकांना छेदून जातात , त्या बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतात. आपण त्याला केंद्रबिंदू ‘0’ असे नाव देऊ. O ह्या केंद्र्बिंदूतून जी रेषा जाते, तिला वर्तुळाचा व्यास म्हणतात. या समोरील वर्तुळाकार कागदावर घडीमुळे दोन व्यास तयार झाले आहेत. आणि याचप्रमाणे आपण या वर्तुळात असंख्य व्यास काढू शकतो. आता तुम्ही केंद्र Oo व वर्तुळावरील बिंदू BB ह्यामधील घडीचे निरीक्षण करा. ह्या रेषेला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. (व्याख्या – वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय. अशा एकाच वर्तुळात आपण असंख्य त्रिज्या काढू शकतो. आता आपल्या वर्तुळाकार कागदाला अशी हवी तशी घडी घाला व पुन्हा उलगडा. आपल्याला दिसेल ही घडी वर्तुळावरील दोन बिंदू जोडते. तिला आपण जीवा असे नाव देऊ. (व्याख्या: वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजेच जीवा होय. अशा अनेक जीवा आपण एकच वर्तुळात तयार करू शकतो. त्रिज्या, जीवा, व्यास वर्तुळ काढणे त्रिज्या व व्यास यांमधील संबंध वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग वर्तुळाचा परीघ व वर्तुळकंस