वर्तुळ

वर्तुळाचा परीघ व वर्तुळकंस

views

3:8
वर्तुळाचा परीघ व वर्तुळकंस वर्तुळाचा परीघ: मुलांनो तुमच्या समोरील आकृतीचे निरीक्षण करा. आकृती १ मध्ये रेषाखंड AB AB ची लांबी मोजण्यासाठी मोजपट्टी वापरावी लागेल. आणि आकृती २ मध्ये XYZXYZ चे माप मोजायचे असल्यास आपल्याला कोनमापक वापरावे लागेल. आकृती ३ मध्ये वर्तुळाकार कड असलेली वाटी आहे. आपण ह्या वाटीची कड मोजू. ही वर्तुळाकार कड मोजण्यासाठी तुम्हाला एक दोरा व मोजपट्टी घ्यावी लागेल. १) प्रथम वातीभोवती दोऱ्याचा एक फेरा घेऊन दोऱ्याचे वर्तुळ तयार करा. २) गुंडाळलेला दोरा बाजूला करून तो सरळ करा. ३) पट्टीच्या साहाय्याने सरळ केलेल्या दोऱ्याची लांबी मोजा. ४) मिळणारी लांबी म्हणजेच दोऱ्याने तयार झालेल्या वर्तुळाचा परीघ होय. तुम्ही ही अशा काही वस्तूंचा परीघ मोजा उदा. ताट, घड्याळ, बाटली इ. वर्तुळकंस: या दोन प्लास्टिकच्या बांगड्यांपैकी जर एक बांगडी फुटली, तर या तुकड्यांना तुम्ही काय म्हणाल? या तुकड्यांना तुम्ही वर्तुळकंस असे म्हणाल.