वर्तुळ Go Back वर्तुळ काढणे views 2:17 वर्तुळ काढणे, कंपासाच्या साहाय्याने वर्तुळ काढण्याची कृती: मुलांनो तुमच्या कंपास पेटीत असणाऱ्या साहित्याचे निरीक्षण करा. यात मोजपट्टी, कोनमापक, त्रिकोण गुण्या, काटकोनी गुण्या, कर्कटक, कंपास असे साहित्य आहे. आज आपण यातील कंपास या उपकरणाच्या मदतीने वर्तुळ काढणार आहोत. ते कसे काढायचे हे आपण पाहू. आपला प्रश्न आहे , ३ से.मी. असलेले वर्तुळ काढा. लागणारे साहित्य : कागद, मोजपट्टी, पेन्सिल, कंपास कृती: १) प्रथम कंपासला पेन्सिल अडकवा. कंपासचे धातूचे टोक व पेन्सिलचे टोक चित्रात दाखवल्याप्रमाणे जुळवून घ्या. २) आता मोजपट्टीच्या साहाय्याने कंपासचे धातूचे टोक व पेन्सिल यामध्ये १,२,३ सेमी अंतर घ्या. (कंपासमध्ये अंतर वाढत जाते असे असे दाखवा.) ३) कागदावर योग्य जागी एक बिंदू घ्या. ४) धातूचे टोक त्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक कागदावर फिरवा. ५) ज्या बिंदूवर कंपासचे टोक ठेवले होते, तो वर्तुळाचा केंद्रबिंदू त्याला BB असे नाव देवू. ६) BB केंद्रबिंदू असलेल्या ३ सेमी त्रिज्येचे वर्तुळ तयार. त्रिज्या, जीवा, व्यास वर्तुळ काढणे त्रिज्या व व्यास यांमधील संबंध वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग वर्तुळाचा परीघ व वर्तुळकंस