ऊर्जासाधने Go Back नूतनीकरणीय views 4:26 नूतनीकरणीय म्हणजे काय ते पाहू. जी ऊर्जा साधने पुन्हा नव्याने निर्माण होतात, किंवा त्यांच्यापासून परत ऊर्जा प्राप्त करता येते त्यांना नूतनीकरणीय ऊर्जासाधने म्हणतात. भरती – ओहोटी, पवनऊर्जा, सौरऊर्जा ही ऊर्जासाधने पुन्हा नव्याने वापरता येतात. तर जी ऊर्जासाधने एकदा वापरल्यानंतर नाश पावतात. आणि त्यांना नव्याने तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात, त्यांना अनूतनीकरणीय ऊर्जासाधने म्हणतात. उदा. :- कोळसा, खनिजतेल, नैसर्गिक वायू.इ. पदार्थांवर आधारित साधने, कायमस्वरूपी राहत नाहीत. ती एकदा वापरली की संपतात. त्यांचा परत वापर करता येत नाही. तसेच पदार्थांवर आधारित ऊर्जासाधने ही मर्यादित स्वरुपात असतात. ती नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. उदा. :- लाकूड, कोळसा, खनिजतेल, नैसर्गिक वायू, अणुउर्जा इत्यादी. यातील अणुऊर्जा ही फक्त अजैविक आहे. तर इतर सर्व साधने जैविक आहेत. यांच्यापासून ऊर्जा तयार होताना प्रदूषण होते. उदा.:- पेट्रोल हे खनिजतेल गाडीत भरल्यानंतर गाडीचालू झाली की, त्यातून धूर बाहेर पडतो. यातील अणुऊर्जा ही फक्त अपारंपरिक आहे. बाकी सर्व पारंपरिक आहेत. म्हणजे बाकी सर्व साधने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाली आहेत. पदार्थांवर आधारित ऊर्जासाधने ही निर्मितीच्या दृष्टीने किफायतशीर आहेत. दूरवरचा विचार केला असता ही साधने जळणारी असल्यामुळे त्यांचा पर्यावरणावर परिणाम होतो. उदा. :- अणुऊर्जा, लाकूड इ. ऊर्जा साधनांचे वर्गीकरण नूतनीकरणीय ऊर्जासाधनांचा वापर खनिजतेल व नैसर्गिक वायू बायोगॅस, कचऱ्यापासून ऊर्जा , अणुऊर्जा प्रक्रियांवर आधारित ऊर्जासाधने सौरऊर्जा भूऔष्णिक ऊर्जा