ऊर्जासाधने

सौरऊर्जा

views

4:6
सूर्यापासून आपल्याला प्रकाश आणि उष्णता मिळते. सूर्य हा पृथ्वीवरील उर्जेचा एकमेव स्त्रोत आहे. सूर्याच्या ऊर्जेला सौरऊर्जा म्हणतात. आपण शिकलो आहोत की, सूर्याची उष्णता पृथ्वीवर सर्वत्र सारखी नसते. शीतकटिबंधीय प्रदेशात ती कमी असते, कारण तेथे सूर्यकिरणे तिरपी पडतात. तर उष्णकटिबंधीय प्रदेशात सूर्याची किरणे लंबरूप पडतात त्यामुळे या प्रदेशात सूर्याची उष्णता जास्त असते. आपला भारत देश हा उष्ण काटिबंधात येतो. त्यामुळे आपल्या देशात या ऊर्जेचा वापर करण्यास अधिक वाव आहे.उदा. :- महाराष्ट्र राज्यातील अति उत्तरेकडील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील साक्री येथे सौरविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पात सौरऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते. सौरउर्जेद्वारा कुकर, दिवे, हीटर, वाहने इ. उपकरणे चालवता येतात. सौरऊर्जेची निर्मिती करताना पुढील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. 1) सूर्यकिरणांची तीव्रता आणि 2) सूर्यदर्शनाचा कालावधी. म्हणजे कडक उन्ह असेल तर सौरऊर्जा व्यवस्थित तयार होते. तसेच ढगाळ वातावरण नसेल तरच सूर्याची किरणे जमिनीवर व्यवस्थित पोहोचू शकतात. सौर ऊर्जेचे अनेक उपयोग आहेत.