ऊर्जासाधने

भूऔष्णिक ऊर्जा

views

3:2
जमिनीच्या अंतर्गत भागातून जसे थंड पाण्याचे झरे वाहतात, तसेच गरम पाण्याचे झरेही जमिनीतून वाहतात. उदा. :- ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी येथे गरम पाण्याचा झरा आहे. तसेच उनपदेव, मणिकरण येथेही हा झरा आहे. पृथ्वीच्या अंतर्भागातील म्हणजे जमिनीच्या आतील भागाचे तापमान प्रत्येक 32 मीटरला 10 से. ने वाढते. म्हणजे भूपृष्ठापासून आत 32 मीटर गेलो की, तिथे असेल त्यापेक्षा 10से. जास्त तापमान 64 मीटरला वाढलेले असेल. या जमिनीखालील तापमानाचा वापर करून आता विद्युतनिर्मिती करण्याची प्रक्रिया माणसाने शोधून काढली आहे. या भूऔष्णिक उर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी करता येतो. भारतात हिमाचल प्रदेश या राज्यात मनीकरण येथे असा प्रकल्प आहे.भू-अंतर्गत उष्णतेचा वापर करून त्यायोगे विद्युत् ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न प्रथम इटलीत १९०४ मध्ये करण्यात आला. भूऔष्णिक ऊर्जेचा वापर करून रशिया, जपान, न्यूझीलंड, आइसलँड, मेक्सिको आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण करण्यात येते. आता पर्यंत बघितलेली प्रक्रियांवर आधारित उर्जासाधने ही अजैविक ऊर्जासाधने आहेत. म्हणजेच ही ऊर्जा तयार करताना मृत सजीवांच्या अवशेषांचा वापर केला जात नाही. परंतु, ही उर्जासाधने पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहेत. या साधनांमुळे कमीत कमी प्रदूषण होते. ही ऊर्जासाधने अक्षयऊर्जासाधने म्हणून ओळखली जातात. कारण ती कधीही संपत नाहीत. एकदा वापरल्यानंतर ती परत – परत तयार होतात. ही सर्व ऊर्जासाधने आपण काळजीपूर्वक वापरली पाहिजेत. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे मानवाच्या गरजा वाढल्या आहेत. यामुळे उर्जेची मागणी वाढते आहे. त्यासाठी पर्यायी व अपारंपारिक ऊर्जासाधनांचा जास्तीत-जास्त वापर केला पाहिजे. आपण ऊर्जेचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. यासाठी आपण गरज नसताना घरातील दिवे, पंखे, टीव्ही, रेडीओ यासारख्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. तरच विजेचा अनावश्यक वापर टळेल. आणि हे आपल्याला सहज शक्य आहे.