पोषण आणि आहार

पोषण व पोषकतत्त्वे आणि अन्नपदार्थ

views

3:21
दिवसभरामध्ये आपण जे विविध प्रकारचे अन्न खातो, त्यास आहार असे म्हणतात. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. नुसता आहार घेऊन चालणार नाही, तर तो आहार समतोल असणे गरजेचे आहे. त्यास संतुलित आहार असे म्हणतात. जर संतुलित आहार आपल्या दैनंदिन जीवनात असेल, तरच योग्य पोषण होते. सजीवांना उर्जा मिळवणे, वाढ होणे, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे आणि आजारांचा प्रतिकार करणे या सर्व कामांसाठी पोषण लागते. आणि या पोषणासाठी लागणारी सर्व पोषकतत्त्वे अन्नातून मिळतात. ही पोषकतत्त्वे जितक्यास चांगल्या प्रकारे शरीराच्या पेशींना मिळतील तितके आपले शरीर सुदृढ आणि आरोग्यपूर्ण बनते.