उष्णता

उष्णतेचे स्रोत

views

4:23
उष्णता म्हणजे काय तर उष्णता म्हणजे ऊर्जा. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे.तुम्ही तुमच्या हाताचे तळवे एकमेकांवर घासून आपल्या गालावर ठेवा आणि पाहा तुम्हाला काय जाणवते? तुम्हाला जाणवेल की हाताचे तळवे एकमेकांवर घासत असताना ते गरम होऊन तेथे उष्णता निर्माण होते. आणि हात आपल्या गालावर ठेवल्यावर गालावर गरम जाणवते. म्हणजेच याठिकाणी हात हातावर घासल्याने तेथे घर्षण होऊन उष्णता निर्माण झाली. पृथ्वी वरील सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जेचा स्त्रोत आहे सूर्य. आणि या सूर्यापासून आपल्याला सर्वात जास्त उष्णता मिळते. सूर्याच्या या उष्णतेमुळे आपण आपले कपडे, धान्य वाळवतो. तसेच झाडांची वाढ होण्यासाठी सुदधा या उष्णतेचा वापर केला जातो. इतकेच काय तर पृथ्वीवर पडणारा पाऊस हा देखील सूर्याच्या उष्णतेमुळेच जलचक्राच्या माध्यमातून पडतो. आपण वर जी उदाहरणे पहिली त्यातून आपल्याला उष्णतेचे काही गुणधर्म समजतात.