उष्णता

उष्णतेचे प्रारण

views

3:54
आता उष्णतेचे प्रारण म्हणजे काय ते आपण समजून घेऊ.कोणतेही माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात.जेव्हा तुम्ही शेकोटीजवळ किंवा सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहता तेव्हा देखील तुम्हाला तुमचे शरीर गरम झाल्याचे जाणवते. सूर्य हा आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे. आणि सूर्य व पृथ्वी या दरम्यान हवाही नाही. हा हवेचा थर हा केवळ पृथ्वीलगतच आहे. पण तरीही ही उष्णता आपल्यापर्यंत येते. तर अशा प्रकारे कोणतेही माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. उष्णतेचे प्रारण होत असताना ही प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडून शोषून घेतला जातो, तर काही भाग परावर्तित केला जातो. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर तसेच अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असते.