उष्णता

उष्णतेचे अभिसरण

views

3:52
याआधी आपण उष्णतेचे वहन कसे होते ते पाहिले. आता आपण उष्णतेचे अभिसरण कसे होते ते पाहूया. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते आणि त्याची घनता कमी होउन ते वरच्या भागाकडे जाते. आणि त्याची जागा वरुन येणारे थंड पाणी घेते. तुम्हाला हे प्रवाह पोटॅशिअम परमँगनेटमुळे लाल जांभळे दिसत असल्याने लगेच ओळखता आले. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण जेव्हा प्रवाहांद्वारे होते. तेव्हा त्या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात.द्रव पदार्थास भांड्याच्या तळाकडून उष्णता दिली तर आधी तळालगतचा द्रव पदार्थ गरम होतो. आणि त्याची घनता कमी होऊन तो वरच्या भागाकडे जातो. या द्रव पदार्थाची जागा वरून येणारा थंड द्रव घेतो. द्रवपदार्थाच्या घनतेतील या फरकामुळे असे प्रवाह निर्माण होऊन त्याद्वारे द्रव पदार्थात उष्णतेचे संक्रमण होते. यास उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. मुलांनो हे लक्षात ठेवा की, अभिसरण हे द्रव व वायुरूप पदार्थांमध्येच होऊ शकते. तसेच अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते.