उष्णता

उष्णतेचे संक्रमण

views

4:20
उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय.जेव्हा आपण एखादी गरम वस्तू थंड वस्तूंच्या सान्निध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते आणि गरम वस्तू थंड होते. यावरून आपल्या लक्षात असे येते कि, उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते.तुम्ही एखादा गरम दुधाने भरलेला ग्लास थंड पाण्यात बुडवून ठेवा. तुमच्या असं लक्षात येईल की ग्लासातील दूध थंड होईल आणि भांड्यातील थंड पाणी गरम होईल. म्हणजेच उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूंकडून थंड वस्तूंकडे होईलउष्णता संक्रमणाचे प्रकार : उष्णतेच्या संक्रमणाचे तीन प्रकार आहेत. :1.उष्णतेचे वहन 2. अभिसरण आणि 3.प्रारण. 1.उष्णतेचे वहन (Conduction): पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणा-या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात. उष्णता वहनास पदार्थाच्या माध्यमाची आवश्यकता असते. म्हणजेच निर्वात पोकळीमधून उष्णतेचे वहन होत नाही. स्थायुरूप पदार्थांमधून उष्णतेचे वहन होते.