विभाज्यता

कसोट्यांचा अभ्यास

views

3:8
आता आपण आणखी काही कसोट्यांचा अभ्यास करूया. 3 ची विभाज्यतेची कसोटी : जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. या काही संख्या दिल्या आहेत. त्या संख्यांतील अंकांची बेरीज आपल्याला काढायची आहे, त्या बेरजेला 3 ने भाग जातो की नाही ते सांगायचे आहे. आणि शेवटी दिलेली संख्या 3 ने विभाज्य आहे की नाही ते ओळखायचे आहे. चला तर मग सुरवात करूयात.. शि: पहा पहिली संख्या आहे 63. या संख्येतील अंकांची बेरीज होते 6 + 3 = 9. आणि 9 ला 3 ने भाग जातो म्हणून 63 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. आता तुम्ही या तक्त्यातील पुढील संख्या 3 ने विभाज्य आहेत की नाही ते सांगा. शि : 872 वि: सर 872 या संख्येतील अंकांची बेरीज आहे 8+7+2=17 आणि 17 ला 3 ने भाग जात नाही म्हणून 872 ही संख्या 3 ने विभाज्य नाही. शि: बरोबर! पुढील संख्या 91 वि : 91 या संख्येतील अंकांची बेरीज आहे 9+1=10 तर 10 ला 3 ने भाग जात नाही. म्हणून 91 ही संख्या 3 ने विभाज्य नाही. शि : आता पुढील संख्या आहे 9336 : वि : सर या संख्येतील अंकांची बेरीज आहे 9+3+3+6=21 आणि 21 हया संख्येला 3 ने भाग जातो. म्हणून 9336 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. शि : छान ! आता शेवटची संख्या आहे 4527 . वि : सर 4527 या संख्येतील अंकांची बेरीज आहे 4+5+2+7+=18 आणि 18 ला 3 ने भाग जातो. म्हणून 4527 ही संख्या 3 ने विभाज्य आहे.