विभाज्यता Go Back 9 ची विभाज्यतेची कसोटी views 4:22 आता आपण 9 ची विभाज्यतेची कसोटी पाहू. 9 ची विभाज्यतेची कसोटी: जर कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 9 ने विभाज्य असते. शि: मुलांनो, पहा 3 च्या कसोटी प्रमाणेच आपल्याला संख्यांना 9 ने पूर्ण भाग जातो का ते पाहायचे आहे. त्या संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला काढायची आहे, त्या बेरजेला 9 ने भाग जातो की नाही ते सांगायचे आहे. आणि शेवटी बेरजेतून मिळालेली संख्या ही 9 ने विभाज्य आहे की नाही ते ओळखायचे आहे. चला तर मग करूया सुरवात. शि: पहा, जर आपण 1980 या संखेला 9 ने भाग दिला तर पूर्ण भाग जाऊन भागाकार मिळतो 220 आणि बाकी शून्य राहते. म्हणजेच 1980 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. आता जर आपण यातील सर्व अंकांची बेरीज केली म्हणजेच 1+9+8+0 तर आपल्याल नवीन संख्या मिळते 18. आणि 18 ला 9 ने नि:शेष भाग जातो. म्हणून 1980 ही संख्याही 9 ने विभाज्य आहे. शि : समजलं ? आता पुढची तक्त्यातील उदाहरणे तुम्ही सांगा. पुढील संख्या आहे 2999. वि: सर 2999 ला 9 ने पूर्ण भाग जात नाही. कारण हया संख्येतील अंकांची बेरीज आहे 2+9+9+9=29 हया संख्येला 9 ने भाग जात नाही. म्हणून 2999 ही संख्या 9 ने विभाज्य नाही. शि: अगदी बरोबर ! आता आपली पुढील संख्या आहे 5004. वि: सर 5004 ला 9 ने भागले तर भागाकार 556 येतो आणि बाकी शून्य राहते. म्हणजेच 5004 ला 9 ने पूर्ण भाग जातो. आणि या संख्येतील अंकांची बेरीज केली तर 5+0+0+4=9 ही संख्या मिळते. आणि 9 या संख्येला 9 या संख्येने साहजिकच पूर्ण भाग जातो. म्हणून 5004 ही संख्या 9 ने विभाज्य आहे. प्रस्तावना कसोट्यांचा अभ्यास 4 ची विभाज्यतेची कसोटी 9 ची विभाज्यतेची कसोटी सरावासाठी गणित