विभाज्यता Go Back 4 ची विभाज्यतेची कसोटी views 4:11 आपण 4 ची विभाज्यतेची कसोटी पाहणार आहोत. 4 ची विभाज्यातेची कसोटी : जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. आपल्याला काही संख्या दिल्या आहेत. या संख्यांना ४ ने पूर्ण भाग जातो का ते आपल्याला पाहायचे आहे. दशक व एककस्थानच्या अंकांनी तयार झालेली संख्या सांगायची आहे. आणि ही तयार झालेली संख्या 4 ने विभाज्य आहे का ते ओळखायचे आहे. चला तर मग करूया सुरवात. शि: आपली पहिली संख्या आहे 992. पहा जर 992 हया संख्येला 4 भाग दिला तर या संख्येला पूर्ण भाग जाऊन याचा भागाकार येतो 248 आणि बाकी शून्य राहते. तसेच दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार झालेली संख्या होते 92. आणि 92 ला ही 4 ने नि:शेष भाग जातो. 92 ही संख्या 4 ने विभाज्य असल्याने 992 ही संख्याही 4 ने विभाज्य आहे. शि: आता पुढील सारणी तुम्ही सोडवा. वि: सर, 7314 ला 4 ने नि:शेष भाग जात नाही. आणि यातील दशक व एकक स्थानातील अंकांनी तयार झालेली संख्या आहे 14. आणि 14 ला 4 ने भाग जात नाही. म्हणून 14 ही संख्या 4 ने विभाज्य नाही, म्हणजेच 7314 ही संख्याही 4 ने विभाज्य नाही. शि: अगदी बरोबर ! आता पुढील संख्या आहे 6448. वि: बाई 6448 ला 4 ने भाग दिला तर भागाकार मिळतो 1612. आणि बाकी शून्य राहते. म्हणजे या संख्येला पूर्ण भाग जातो. आणि या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार झालेली संख्या आहे 48. या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. म्हणून 48 ही संख्या 4 ने विभाज्य आहे. आणि म्हणूनच 6448 ही संख्याही 4 ने विभाज्य आहे. प्रस्तावना कसोट्यांचा अभ्यास 4 ची विभाज्यतेची कसोटी 9 ची विभाज्यतेची कसोटी सरावासाठी गणित