आकृतीबंध

सरावासाठी उदाहरणे

views

2:14
आता आपण सरावासाठी आणखी काही उदाहरणांचा अभ्यास करू या. तुम्ही पुढील संख्यांमध्ये कोणती संख्या चौरस आहे आणि का आहे ते मला सांगा ! शि: : 5, 9, 12, 16, 50, 60, 64, 72, 80, 81. वि: सर एका संख्येला त्याच संख्येने गुणून जी संख्या मिळते ती चौरस संख्या असते. या नियमाप्रमाणे  9 ही चौरस संख्या आहे. कारण 3 x 3= 9 आहे.  16 ही चौरस संख्या आहे. कारण 4 x 4 = 16 आहे.  64 ही चौरस संख्या आहे. कारण 8 x 8 = 64 आहे.  81 ही चौरस संख्या आहे. कारण 9 x 9= 81 आहे. बाकी राहिलेल्या सर्व संख्या या चौरस संख्या नाहीत. शि: अगदी बरोबर ! बरं मला सांगा, जर पहिली चौरस संख्या ४ मानली, तर क्रमाने येणारी दहावी चौरस संख्या कोणती असेल? वि : 2 ×x 2 = 4, 3 ×x 3 = 9, 4 x× 4 = 16, 5 x× 5= 25, 6 ×x 6 = 36, 7 x× 7= 49, 8 ×x 8 = 64, 9 x× 9 = 81, 10 x× 10 = 100, 11 ×x 11 = 121. म्हणून क्रमाने येणारी दहावी चौरस संख्या 121 असेल. शि: अगदी बरोबर !