आकृतीबंध

फरश्यांच्या जुळणीतील आकृतिबंध

views

1:23
फरश्यांच्या जुळणीतील आकृतिबंध मुलांनो, जर तुम्ही या दोन्ही फरशांचे निरीक्षण केलेत तर तुम्हाला दिसेल की यामध्ये विशिष्ट प्रकारचा आकृतिबंध तयार झाला आहे. या चित्रांतील दोन फरशांमध्ये मोकळी जागा राहिलेली नाही. त्यामुळेच फरश्यांच्या प्रत्येक जुळणीत एक आकृतिबंध तयार झाला आहे. अशा प्रकारचे आकृतिबंध तुम्हाला आणखी कोठे पाहायला मिळतात सांगा बरं? शि: सर रस्त्यावर घातलेले पेव्हर ब्लॉक असेच असतात. तसेच चेस च्या खेळातील पट पण असाच असतो शि: अगदी बरोबर ! आता आपण हे आकृतिबंध तयार कसे होतात ते पाहू. यासाठी एक मोठे कार्डशीट घ्या. त्यावर अनेक आकृत्या काढा. आता या आकृत्या कापून वेगवेगळ्या करा. त्यातील निम्मे तुकडे कार्डशीटच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाने रंगवा. पहा एक सुंदर आकृतिबंध तयार झालेला आपल्याला दिसतो आहे. या सारखे इतर आकारांचेही आकृतिबंध तुम्ही तयार करू शकता.