त्रिमितीय आकार Go Back इष्टिकाचिती views 4:27 इष्टिकाचिती: मुलांनो, आज आपण त्रिमितीय आकारांचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही एकावर एक अशी ठेवलेली पुस्तके किंवा माचीसच्या डब्या पाहिल्या असतील. रचलेली पुस्तके किंवा माचीस यांचे अगदी बारकाईने निरीक्षण केलेत तर आपल्या लक्षात येईल की पुस्तके किंवा माचीसच्या डबीची सर्व पृष्टे आयताकार असतात. आणि त्यांची समोरासमोरील पृष्ठेही अगदी सारखीच दिसतात. यालाच आपण ‘इष्टिकाचिती’ असे म्हणतो. खाली दाखवलेल्या घडणी पासून इष्टिकाचिती चा आकार तयार होतो. आता ही घडण पहा, या घडणीपासून हा बॉक्स तयार झाला आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घडणीतून वेगवेगळे आकार तयार होतात. आता आपण इष्टिकाचिती कशी असते ते पाहू. यासाठी ही आकृती पहा. (पान क्र. 93 वरील आकृती) या आकृतीमधील सर्व पृष्ठे आयताकार आहेत. आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. या आकृतीमध्ये एकून 12 कडा आहेत. कोणत्या ते पहा. रेख AP, रेख BQ, रेख CR, रेख DS, रेख AB, रेख BC, रेख CD, रेख DA, रेख PQ, रेख OR, रेख RS आणि रेख SP. तसेच या इष्टिकाचितीला एकूण 8 शिरोबिंदू आहेत. कोणते ते पहा : बिंदू A, बिंदू B, बिंदू C, बिंदू D, बिंदू P, बिंदू Q, बिंदू R, बिंदू S. आता या इष्टिकाचितीची पृष्ठे कोणती आहेत ती पहा: हिला एकूण 6 पृष्ठे आहेत. चौकोन ABCD, चौकोन PQRS, चौकोन ABQP, चौकोन BCRQ, चौकोन CRSD आणि चौकोन DSPA. तर मुलांनो, यावरून आपल्या लक्षात येते की इष्टिकाचितीला एकूण 12 कडा, 8 शिरोबिंदू आणि 6 पृष्टे असतात. इष्टिकाचितीला चौकोनी चिती असेही म्हणतात. इष्टिकाचिती त्रिकोणी चिती सूची शंकू माहिती घेऊ