त्रिमितीय आकार

त्रिकोणी चिती

views

3:58
त्रिकोणी चिती : या चितीला एकूण 6 शिरोबिंदू आहेत. तर कडा 9 च आहेत. आणि याला एकूण 5 पृष्ठे आहेत. तर अशा प्रकारच्या आकृतीला त्रिकोणी चिती असे म्हणतात. वृत्तचिती (दंडगोल): वृत्त म्हणजे वर्तुळ. तुमच्या घरामध्ये वर्तुळाकर तळ असलेल्या वस्तू तुम्ही पाहिल्या असतील. कोणकोणत्या वस्तू वर्तुळाकार तळ असलेल्या असतात सांगा बरं? विद्याथी:- डब्बा, गॅसचे सिलिंडर , बरणी शिक्षक:- अगदी बरोबर! डबा हे वृत्तचितीचे एक उत्तम उदाहरण आहे. या आकाराचा तळ वर्तुळाकार असल्याने याला वृत्तचिती असे म्हणतात. डबा बंद असेल तर त्याला बंदिस्त वृत्तचिती असे म्हणतात. पण मुलांनो वृत्तचितीला एकही शिरोबिंदू नसतो. त्याला दोन सपाट वर्तुळाकार आणि एक वक्रपृष्ठ असते. तसेच वृत्तचितीला दोन वर्तुळाकार कडाही असतात. वृत्तचितीची आकृती कशी तयार होते ते आपण एका कागदाच्या मदतीने तयार करून पाहू. यासाठी प्रथम एक आयताकार कागद घ्या. त्या कागदाच्या समोरासमोरील बाजू एकमेकांशी जुळवा. पहा आपल्याला पोकळ वृत्तचिती तयार झालेली दिसेल. आता वृत्तचिती आकाराचा एक डबा घ्या. त्या डब्याच्या उंची एवढा आयताकार कागद घेऊन त्या डब्याला गुंडाळा. आता हा कागद उलगडून टेबलावर ठेवा. त्यानंतर एक वेगळा कागद घ्या. आणि या कागदावर तो डबा ठेवून डब्याच्या तळाच्या कडेने पेन्सीलने वर्तुळ काढा. त्या रेखाटलेल्या वर्तुळाचा भाग कापून काढा. तसेच आणखी एक वर्तुळ कापा. आणि आयताकृती कागदाला ती दोन वर्तुळे चिकटून ठेवा . पहा बंद वृत्तचितीची आकृती तयार झाली आहे. अशा प्रकारे आपण वृत्तचिती तयार करू शकतो.