त्रिमितीय आकार

सूची

views

3:24
सूची:- मुलांनो ही आकृती पहा. त्रिकोणी पुष्ठे सारख्या आकाराची असणारी ही आकृती एका कार्डशीटवर काढा आणि कडांवर कापून घ्या. आता चौकोनाच्या ठिपक्यांच्या ओळींवर दुमड घालून A,B,C,D हे शिरोबिंदू एकत्र येतील असे जुळवा. पहा हा पिरॅमिड सारखा आकार तयार झाला आहे. या आकाराच्या तळाचे पृष्ठ चौकोनी आहे. आणि उभी चार पृष्ठे ही त्रिकोणी आकाराची आहेत. या प्रकारच्या आकाराला सूची असे म्हणतात. (पान क्र. 95 पहा). चौकोनी सूची :पहा, या त्रिमितीय आकाराचे वरचे टोक सुईसारखे आहे. आणि याचे तळाचे पृष्ठ हे चौकोनी आहे. म्हणून या आकाराच्या सूचीला चौकोनी सूची असे म्हणतात. चौकोनी सूचीला एकूण 5 पृष्ठे, 8 कडा आणि 5 शिरोबिंदू असतात. 5 पृष्ठांपैकी एक पृष्ठ तळाशी तर चार पृष्ठे ही उभी असतात. आणि 1 शिरोबिंदू वरच्या बाजूस असतो. त्रिकोणी सूची म्हणजे काय हे समजण्यासाठी एका कागदावर अशी घडण काढा आणि ती कडांवर कापून घ्या. आता मधल्या त्रिकोणाच्या ठिपक्यांच्या बाजूंवर घड्या घालून कडेच्या त्रिकोणांचे शिरोबिंदू जुळवून घ्या. पहा एक सूची तयार झाली आहे. या सूचीचा तळ त्रिकोणी आकाराचा आहे म्हणून हिला त्रिकोणी सूची असे म्हणतात. त्रिकोणी सूचीला एकूण 4 पृष्ठे असतात. तर कडा 6 असतात. आणि 4 शिरोबिंदू असतात.