संविधानाची उद्देशिका

उद्देशिकेची मूल्ये

views

3:08
उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांची हमी दिली आहे. त्यानुसार कायदे करण्याची हमी दिली आहे. तर आता आपण या मूल्यांचा अर्थ समजून घेऊयात. 1) न्याय:- कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्याच्यावरील अन्याय दूर करून त्याला आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्वांचेच कल्याण होईल अशा दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. न्यायाचे मुख्य तीन प्रकार पडतात. सामाजिक न्याय :- व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान,लिंग या वरून भेदभाव केला जात नाही. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून समान असतो.आर्थिक न्याय :- भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे व दारिद्रयामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर कुटुंबातील व्यक्तींचे पालन-पोषण होणे आवश्यक असते. त्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. आपल्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. प्रत्येकजण आपापल्या पात्रतेप्रमाणे उपजीविकेचे साधन शोधू शकतो. राजकीय न्याय :- भारतीय संविधानात राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा यासाठी प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. या पद्धतीत कोणत्याही व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म, संपत्ती लक्षात घेतली जात नाही. वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि भारतीय नागरिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मतदान करता येते. पूर्वीच्या काळी इंग्लंडमध्ये मतदानाचा हक्क केवळ श्रीमंतांनाच असे. तसेच युरोपात अनेक वर्षे स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता. भारतीय संविधानाने मतदार होण्यासाठी फक्त वयाची अट ठेवली आहे.