पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार

ऋण संख्यांचा पाढा

views

3:39
ऋण संख्यांचा पाढा : मुलांनो, आता आंपण ऋण संख्येचा पाढा कसा तयार होतो ते पाहू. यासाठी आपण (-6) चा पाढा तयार करू. (-6) × 0 = 0, (-6) × 1 = - 6, (-6) × 2 = -12, (-6) × 3 = -18 मुलांनो, या आकृतिबंधाचे निरीक्षण केलेत तर तुम्हाला कळेल की येथे (-6) चा गुणक एका एककाने वाढला की गुणाकार 6 ने कमी होतो. आता हाच आकृतिबंध ठेवून (-6) चा पाढा वरच्या बाजूला गुणक कमी करून वाढवला, तर तो कसा तयार होतो ते पाहू. (-6) × (-3) = 18, (-6) × (-2) = 12, (-6) × (-1) = 6, (-6) × 0 = 0 आता हा पहा, हा आकृतिबंध असा तयार झाला आहे.यामध्ये (-6) चा गुणक एका एककाने कमी केला कि गुणाकार 6 ने वाढतो.