वितरणाचे नकाशे Go Back नकाशाशी मैत्री views 4:09 टिंब पद्धतीचे नकाशे काढताना एखाद्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशामध्ये तेवढी टिंबे देणे आवश्यक असते. पण ही टिंबे रांगोळी काढताना समान अंतरावर जशी काढतात तशी काढायची नसतात. तर ज्या भागात जेवढी लोकसंख्या आहे, त्याप्रमाणे ठेवायची असतात. म्हणजे जेथे लोकसंख्या जास्त आहे व दाट आहे तेथे आपोआप टिंबे जवळ येतील पण विरळ लोकवस्तीच्या ठिकाणी टिंबे दूरदूर असतील. क्षेत्रघनी पध्दतीत नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी छाया किंवा छटांनी दाखवली जाते. त्यासाठी आपण अमरावती जिल्हा लोकसंख्येची घनता या नकाशाच्या साहाय्याने अभ्यास करणार आहोत. हे नकाशे काढताना टिंब पद्धतीसारखी फक्त गणना पध्दत न वापरता घटकांच्या मापन, सर्वेक्षण इ. प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते. प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. त्यानुसार त्यांचे ५ ते ७ गटांत वर्गीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात. ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात. प्रस्तावना टिंब पद्धत नकाशाशी मैत्री रंगछटा समघनी पद्धत माहितीच्या आधारे खालील टप्पे वापरून समघनी नकाशा तयार केला जातो नकाशाशी मैत्री भौगोलिक क्षेत्रभेट क्षेत्राची निवड