बाह्यप्रक्रिया भाग २ Go Back प्रस्तावना views 4:14 आतापर्यंत आपण पाहिले की भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालींतून नवीन भूरूपे तयार होतात. नंतर त्यावर ऊन, वारा, पाऊस यांसारख्या घटकांचा परिणाम होऊन त्यांची झीज होते, झिजेतून तयार झालेल्या गाळापासून नवीन भूरूपे तयार होतात, याची आपण माहिती घेतली. आज आपण या पाठात हा गाळ वाहून नेणारी कारके आणि त्या गाळापासून तयार होणारी नवीन भूरूपे यांची माहिती घेणार आहोत. बाह्यप्रक्रिया: आपण पाहिले की खनन किंवा अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची म्हणजे पृथ्वीच्या वरच्या थराची म्हणजेच जमिनीची झीज होते. ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा, भूजल यांच्यामुळे ही झीज होते. ही झीज सतत होत असते. भूपृष्ठाची झीज प्रामुख्याने कारकांच्या वाहण्यातून मिळणाऱ्या गतिजन्य ऊर्जेमुळे होते. म्हणजेच नदी जर जास्त वेगाने वाहत असेल तर त्या ठिकाणच्या भूपृष्ठाची झीज जास्त होते आणि नदी संथपणे वाहत असेल तर झीज कमी प्रमाणात होते. ही गतिजन्य ऊर्जा वाहणाऱ्या पदार्थाचे वस्तुमान व वाहण्याचा वेग यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ हिमनदीच्या वाहण्याचा वेग कमी असतो कारण पाण्यापेक्षा बर्फाचे वस्तुमान जास्त असते. त्यामुळे गतिजन्य ऊर्जा कमी असते. खडकांची झीज होऊन म्हणजे अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो. कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते. या पद्धतीने वाहते पाणी (नदी), हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण- वहन आणि संचयन ही कार्ये करतात. या कारकांमुळे भूपृष्ठात काळाच्या ओघात बदल घडून येतात आणि नवनवीन भूरूपे तयार होतात. ही नवीन भूरूपे कोणती आहेत व ती कशी तयार होतात याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. प्रस्तावना नदीचे खनन कार्य नदीचे वहन व संचयनकार्य मुलांनो ही चित्रे पहा यातील हिमनदीचे खनन कार्य हिमनदीचे वहन व संचयन कार्य वाऱ्याचे कार्य व भूरूपे वाऱ्याचे संचयनकार्य सागरी लाटांचे कार्य व भूरूपे सागरी लाटांचे संचयन कार्य भूजलाचे कार्य व भूरूपे