बाह्यप्रक्रिया भाग २

वाऱ्याचे संचयनकार्य

views

4:38
वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण निरनिराळ्या आकारमानाचे असतात. काही सूक्ष्म, तर काही छोटे, मोठे अशा विविध प्रकारचे असतात. यातील सूक्ष्मकण वाहून नेणे सहज शक्य असल्याने ते खूप दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात. तर तुलेनेने मोठे व जड कण वाहून नेणे सहज शक्य नसते. असे जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. या वाळूचे वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात संचयन होते. त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होते. उदा. वाळूच्या टेकड्या, बारखाण, सैफ, उर्मिचिन्हे, लोएस मैदान इ. भूरूपे वाऱ्याच्या संचयनकार्यातून निर्माण होतात. यांची थोडक्यात माहिती घेऊ. १)वाळूच्या टेकड्या/वालुकागिरि : हे भूरूप विशेषतः उष्ण वाळवंटी प्रदेशात किंवा सागरी किनाऱ्यावर पाहायला मिळते. आकारानुसार वालुकागिरीचे बारखाण व सैफ असे दोन प्रकार पडतात.