बाह्यप्रक्रिया भाग २ Go Back वाऱ्याचे कार्य व भूरूपे views 4:00 हवेच्या हालचालीस ‘वारा’ म्हणतात. ते तुम्हाला माहीत आहेच. मुलांनो, जसे नदी द्रवरूप, हिमनदी स्थायुरूप तसेच वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्यामुळेसुद्धा खडकांची झीज होऊन त्याच्या वहन व संचयन कार्यातून नवीन भूरूपे तयार होतात. वाऱ्याचे खनन, वहन व संचयनकार्य हे मुख्यत: वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा अडथळा नसणाऱ्या प्रदेशात वाऱ्याचे कार्य प्रभावी आढळते. उदा. घरे, इमारती, वने इत्यादी यांचा अडथळा नसणाऱ्या वाळवंटी व ओसाड प्रदेशात वाऱ्याचे कार्य प्रभावीपणे चालते. अशा वाळवंटी व कमी पावसाच्या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. या प्रदेशात वाऱ्याच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो. त्यामुळे वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाऱ्याबरोबर वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्याठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो, अशा ठिकाणी ती वाळू साचते. अशा प्रकारे खनन, वहन व संचयनाचे कार्य वारा करतो. प्रस्तावना नदीचे खनन कार्य नदीचे वहन व संचयनकार्य मुलांनो ही चित्रे पहा यातील हिमनदीचे खनन कार्य हिमनदीचे वहन व संचयन कार्य वाऱ्याचे कार्य व भूरूपे वाऱ्याचे संचयनकार्य सागरी लाटांचे कार्य व भूरूपे सागरी लाटांचे संचयन कार्य भूजलाचे कार्य व भूरूपे