सागरजलाचे गुणधर्म Go Back प्रस्तावना views 3:44 आज आपण सागरजलाविषयी माहिती घेणार आहोत. म्हणजे सागरजलाची क्षारता, घनता, तापमान यांवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांची माहिती आपण घेणार आहोत. पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा जलसाठा आहे. भूपृष्ठावरील क्षार पाण्यात विरघळतात आणि नदीद्वारे या क्षारांचे सागरात संचयन होते. लाखो वर्षे ही क्रिया सतत चालूच आहे. बाष्पीभवन क्रियेमुळे सागरातील फक्त पाण्याची वाफ होते पण क्षार तेथेच राहतात. त्यामुळे सागरजल खारट असते. सागरजलाच्या काही प्रमुख गुणधर्मांचा विचार करणारा आहोत. तापमान हा सागरजलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. सागरजलाचे पृष्ठीय तापमान म्हणजे सागराच्या वरच्या पातळीवरच्या पाण्याचे तापमान सर्वत्र सारखे नसते. काही भागत ते जास्त तर काही भागात ते कमी असते. सागरजलाच्या तापमानात आढळणारी ही भिन्नता किंवा फरक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. उदा. अक्षवृत्त, चक्रीवादळ, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागरी प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह व ऋतू या घटकांचाही सागराच्या तापमानावर परिणाम दिसून येतो. यातील अक्षवृत्ताचा विचार केल्यास सागरजलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्तीय प्रदेशात जास्त असते. तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे हे तापमान कमी कमी होत जाते. आपण पाहिले त्याप्रमाणे विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 25० से, मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात 16० से, तर ध्रुवीय प्रदेशात 2० से पर्यंत असते. म्हणजेच, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे तापमान कमी-कमी होत गेलेले दिसते. प्रस्तावना सागरी प्रवाहाचे तापमान क्षारता प्रयोग जरा विचार करा नकाशाशी मैत्री जरा विचार करा. (अधिक माहिती) घनता