सागरजलाचे गुणधर्म

क्षारता

views

3:29
सागरजलाच्या तापमानावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे सागरजलाची क्षारता होय. आता आपण या क्षारतेविषयीची माहिती जाणून घेऊ पाण्यातील क्षारांचे प्रमाण म्हणजे क्षारता होय. सागरी जलातील क्षारांचे प्रमाण दर हजारी अशा स्वरुपात सांगितले जाते. दरहजारीचे %० हे चिन्ह आहे. सागरजलात लाखो वर्षांपासून झालेल्या क्षारांच्या संचयनामुळे सागरजल खारट होते. जास्त तापमान, बाष्पीभवनाचा जास्त वेग, गोड्या पाण्याचा कमी पुरवठा, भूवेष्टित समुद्र यामुळे सागरजलाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. सागर जलातील क्षारतेमुळे पाण्याची उद्धरण क्षमता वाढते. म्हणजे क्षार जास्त असलेल्या पाण्यावर मोठी व अवजड जहाजे सहज तरंगतात. त्यामुळे याचा उपयोग जलवाहतुकीसाठी होतो. सागरजलावरून कितीही अवजड वस्तू वाहून नेली जाऊ शकते, ती या क्षारतेमुळेच. मिठागरांच्या माध्यमातून आपण समुद्रातील क्षार एकत्र करून त्यापासून मीठ बनवू शकतो. मीठ आपल्या आहारासाठी आवश्यक असते. आपण जे अन्न खातो, त्या अन्नाला चव कशामुळे येते? तर ती मिठामुळे. मीठ फक्त चवीसाठीच वापरले जाते असे नाही, तर मिठाचे विविध उपयोग आहेत. उदाहरणार्थ विविध प्रकारची रसायने आणि औषधे तयार करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणूनही मीठ वापरले जाते. उदा. धान्यामध्ये म्हणजे ज्वारी, तांदूळ यांसारख्या धान्यांत अळ्या, किडे लागू नयेत म्हणून मिठाचे मोठे खडे टाकले जातात. तसेच बर्फ तयार करण्याच्या कारखान्यातही मिठाचा वापर केला जातो.