सागरजलाचे गुणधर्म

सागरी प्रवाहाचे तापमान

views

5:31
सागरजलाच्या तापमानावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे सागरी प्रवाह होय. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात, त्या भागात सागर जलाचे पृष्ठीय तापमान कमी असते, तर उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचे तापमान वाढते. सागरजलाचे तापमान वेगवेगळ्या अक्षवृत्तीय भागात तसेच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये खोलीनुसार कसे बदलतेसागरपृष्ठावरून सूर्यकिरणे परावर्तित होतात, म्हणजेच ती सागराच्या पाण्यात न शिरता ती उलटी फिरतात. उदा. तुम्ही जर उन्हात सूर्याकडे तोंड करून आरसा किंवा काचेचा थोडा मोठा तुकडा हातात घेऊन उभे राहिलात तर सूर्याची किरणे त्या आरशावर किंवा काचेच्या तुकड्यावर पडून दुसरीकडे निघून जातात. ती आपल्याला उजेडाच्या रूपात दिसतात. अशाच प्रकारे सूर्याची बरीच किरणे सागराच्या पृष्ठभागावरून परावर्तीत होतात. तर काही सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरू शकतात. त्यामुळे जसजसे सागराच्या आत जाऊ तसतसे सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, पृष्ठभागावर तापमान जास्त आढळते. कारण तेथे सूर्याच्या उष्णतेची तीव्रता जास्त असते. त्यामुळे सागराच्या आतील भागात 2000 मी. खोलीपर्यंत तापमानात घट होत जाते. मात्र 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. कारण तिथपर्यंत सूर्यकिरणे पोहचू शकत नाहीत. 2000 मीटर खोलीपर्यंतचे सागर जलाचे तापमान ध्रुवीय प्रदेशांपासून विषुववृत्तीय प्रदेशांपर्यंत सर्वत्र सारखे म्हणजे सुमारे 4० से पर्यंत असते. खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 4० से. पर्यंतच कमी होते. त्यामुळे सागरजलाच्या पृष्ठभागावर जरी बर्फ तयार झाले तरी जास्त खोलीवर सागरजल कधीही गोठत नाही.