सागरजलाचे गुणधर्म

नकाशाशी मैत्री

views

4:27
नकाशात जगातील कोणत्या भागात किती सागरजल क्षारता आढळते हे दाखविले आहे.कर्कवृत्ताच्या आसपास सागरजलाची क्षारता ३६% असून मकरवृत्ताच्या आसपास ३५% इतकी आहे.अर्क्ट्रीक्त (Artict) महासागराच्या बहुतांश भागात सर्वात कमी क्षारता दिसून येत असून ती ३२% पेक्षाही कमी आहे.अटलांटिक महासागरात ३७% पेक्षा जास्त क्षारता आढळते अक्षवृत्तानुसार तापमानात पडणारा फरक, बाष्पीभवनाचे कमी-जास्त प्रमाण, नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भुवेष्टित स्वरूप या कारणांमुळे जागतिक स्तरावर क्षारतेत फरक पडतो. पृथ्वीवरील तापमान वितरणातील असमानता, गोड्या पाण्याचा पुरवठा आणि त्यातील असमानता इ. बाबी सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात. उष्ण कटिबंधात तापमान जास्त असते. त्यामुळे तेथे बाष्पीभवनाचा वेगही जास्त असतो, परिणामी सागरजलाची क्षारताही जास्त असते. विषुववृत्तापासून साधारण 5० उत्तर व 5० दक्षिण अक्षवृत्तांदरम्यानच्या शांत पट्टयात आकाश जास्त काळ ढगाळ असते. याठिकाणी दररोज आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तसेच उष्ण कटिबंधातील आफ्रिकेतील कांगो, अमेरिकेतील अॅमेझॉनसारख्या जगातील मोठ्या नद्या या ठिकाणच्या महासागराला मिळतात. त्यामुळे पावसाचे पाणी आणि नद्यांचे पाणी या दोन्हींमुळे गोड्या पाण्याचा पुरवठाही जास्त असतो. परंतु या ठिकाणच्या अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने येथील प्रदेशात क्षारतेचे प्रमाण मध्य असते. मध्य अक्षवृत्ती पट्ट्यात म्हणजे 25० ते 35० उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यानचा प्रदेश, या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असते. नद्यांतून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. या पट्ट्यामध्ये वाळवंटी प्रदेश आहेत. त्यामुळे जास्त तापमान असते. परिणामी तेथील सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली आढळते. समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने त्या प्रदेशातील तापमान कमी असते. तसेच बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील जास्त असतो. म्हणून या कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार म्हणजेच 35० पासून जसजसे उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाऊ तसतसे सागरजलक्षारता कमी होत जाते.