वनस्पतींचे वर्गीकरण

वर्गीकरणाचा आधार

views

3:31
वनस्पतींचे वर्गीकरण करण्यासाठी सर्वप्रथम वनस्पतींचे अवयव विचारात घेतले जातात. त्यानंतर पाणी, अन्नग्रहण करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्था आहे की नाही हे पाहिले जाते. तसेच वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे की नाही हे तपासले जाते. किंवा जर बिया धारणाची क्षमता असेल तर बियांवर फळाचे आवरण आहे किंवा नाही याचा विचार केला जातो. शेवटी बियांमधील बीजपत्राच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात. अवयव, ऊतीसंस्था, बिया धारणक्षमता, बियांवरील फळाचे आवरण आणि बीजपत्रांची संख्या. वनस्पतींचे वर्गीकरण करताना काही लक्षणांचा विचार केला जातो. वनस्पतीच्या उच्चस्तरातून म्हणजेच वरच्या भागात फुले, फळे, बिया येतात की नाही यावरून बीजपत्री व अबीजपत्री असे वर्गीकरण करण्यात येते. तसेच बीजे फळाच्या आवरणात आहेत की नाहीत यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि या बिजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात.वनस्पतीशास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पतीसृष्टीचे दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टींत वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते.