वनस्पतींचे वर्गीकरण

उपसृष्टी - अजीबपत्री वनस्पती - थॉलोफायटा

views

3:19
या वनस्पतींची संरचना अतिशय साधी असते. त्या एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. त्या बहुपेशीय असल्या, तर अनेक पेशी एकत्र येऊन त्यांची वसाहत बनते किंवा पेशी एकापुढे एक जोडल्या जाऊन तंतू तयार होतात. या वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव नसतात. या गटातील वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. थॅलोफायटा वनस्पतीमध्ये शैवाल, कवक आणि जीवाणू यांचा समावेश होतो. मूळ, खोड, पाने- फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या व हरितद्रव्यामुळे स्वंयपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या गटाला ‘शैवाल’ असे म्हणतात. शैवालामध्ये एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात. या वनस्पती प्रामुख्याने गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात आढळतात. या वनस्पतींच्या पेशींमध्ये हरितलवके असल्याने त्या स्वतःचे अन्न स्वत: तयार करतात. उदा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम कवक गटातील वनस्पती मृतोपजीवी अथवा शवोपजीवी असतात. त्यांच्यामध्ये हरितलवक नसते. त्यामुळे या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. म्हणून त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात. दमट ओल्या जागेत कार्बनी पदार्थावर त्या वाढतात. उदा. बुरशी, म्यूकर, किण्व, भूछत्रे, पेनिसिलीयम ही कवकाची उदाहरणे आहेत.