वनस्पतींचे वर्गीकरण

आवृत्तबीजी वनस्पती

views

04:28
ज्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत. त्यांना एकबीजपत्री म्हणजेच ‘एकदल’ असे म्हणतात. तर ज्या बियांचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल असे म्हणतात. आवृत्तबीजी वनस्पतींना येणारी फुले हे त्या वनस्पतीचे प्रजननाचे अवयव आहेत. म्हणून फूल हे वनस्पतीचे ‘प्रजननांग’ असते. फुलांचे रूपांतर फळांत होते. फळाच्या आत बिया तयार होतात. या बियांवर आवरण असते. Angious-cover (योग्य word घ्या) म्हणजे आवरण, Sperm – बी यावरून या वनस्पतीला Angiosperms म्हणजे आवृत्तबीजी म्हणतात. या आवृत्तबीजी वनस्पतींची बीजे संरक्षक आवरणाने झाकलेली असतात. फलनानंतर बीजांडाचे रुपांतर बीजामध्ये होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. आवृत्तबीजी वनस्पतींचे बीयांच्या दलांवरून दोन प्रकार पडतात. 1) एकबीजपत्री आणि 2) द्विबीजपत्री. 1) एकबीजपत्री-ज्या बियांचे सहज दोन भाग होत नाहीत त्यांना एकबीजपत्री असे म्हणतात. उदा. मका, गहू, मोहरी, कांदा, लसूण, केळी, इत्यादी. 2) द्विबीजपत्री-ज्या बियांचे सहज दोन सुटे भाग होतात त्यांना द्विबीज पत्री असे म्हणतात. उदा. वाटाणा, शेंगदाणा, घेवडा, सदाफुली, सूर्यफूल, लिंबू, आंबा, इत्यादी.