सजीवांचे परस्परांशी नाते

सांगा पाहू !

views

04:22
काही प्रश्नांची उत्तरे पाहुयात. रेशीम माणसाला कोठून मिळते? रेशमाच्या किड्याच्या कोशापासून माणसाला रेशीम मिळते. झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो? पक्षी झाडांवर आसरा घेतात. ते झाडांवर घरटी बांधतात. काही पक्षी झाडांची फळे खातात. तर काही पक्षी झाडांवरचे कीटक खातात. झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो? माकडे झाडांवर राहातात. एखादे संकट आले तर ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारून सुरक्षित जागी जाऊन राहतात. जमिनीपेक्षा ती झाडांवरच आपला निवारा शोधतात. माकडांचे अन्न फळे, पाने, फुले आहे. त्यामुळे ती आपली भूक भागविण्यासाठी झाडांवरच अवलंबून असतात. वाळवीने झाड पोखरले तर काय होते? वाळवीने झाड पोखरले तर ते आतून पोकळ होते. कमजोर होते. त्याची वाढ खुंटते व ते कोसळते.