सजीवांचे परस्परांशी नाते

ऋतूमनाप्रमाणे सजीवांमध्ये होणारे बदल भाग २

views

04:42
आपल्याकडे हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे प्रमुख तीन ऋतू असतात. या ऋतूंप्रमाणे सजीवांमध्ये बदल होत असतात. आंब्याच्या झाडाला येणाऱ्या फुलोऱ्याला मोहोर म्हणतात.हिवाळा सुरु असतानांच आंब्याला फुलोरा येऊ लागतो.ऋतू बदलाचा परिणाम मानवाच्या जगण्यावरही होतो. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतू असतात. ऋतूंप्रमाणे आपली राहणीमान बदलावी लागते. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते. त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो. तसेच उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे आपल्याला भरपूर तहान लागते. तहान भागविण्यासाठी आपण भरपूर पाणीही पितो. पावसाळ्यात पाऊस पडत असताना बाहेर जाताना अंग भिजू नये, म्हणून छत्री वापरतो. तर शेतात काम करताना कोकणातील शेतकरी इरले वापरतात. काहीजण रेनकोट वापरतात. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून स्वेटर, शाल, मफलर, कानटोपी यांसारख्या उबदार कपड्यांचा वापर करतो. माणसाच्या राहणीवर जसा तिन्ही ऋतूंचा परिणाम होत असतो. तसा तो इतर सजीवांवरही होतो. सजीवसृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात. तसेच प्राण्यांमध्येही बदल घडून येतात. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस हिवाळ्यात दाट होतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआप संरक्षण होते. उदा. मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये केसांची होणारी अशी वाढ चटकन लक्षात येईल इतकी असते.