नियम सर्वांसाठी

प्रस्तावना

views

3:14
वाहतुकीचे नियम तुम्हाला माहीत असतीलच. उदाहरणार्थ, लाल सिग्नल लागला की गाड्या थांबतात, मग रस्ता पार करावा. रस्ता नेहमी झेब्रा लाईन्सवरूनच पार करावा. पिवळा सिग्नल झाला की गाड्यांचा वेग कमी करावा. हिरवा सिग्नल लागला की गाड्या चालू होणार. नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. तर मुलांनो, हे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळले तर रस्त्यावर कोणताही अपघात घडणार नाही, वाहतूक सुरळीत होईल. वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम करण्यात आले आहेत, ते आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला पाळावे लागतात. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करावे यासाठीही काही नियम असतात. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात, तेव्हा एक विद्यार्थी म्हणून शाळेचे नियम पाळणे हे त्या मुलावर बंधनकारक असते. शाळेची वेळ, अभ्यासाची वेळ, खेळण्याची वेळ या संदर्भात मुलांना नियम घालून दिलेले असतात. ते त्यांना पाळावे लागतात. प्रत्येकाची जबाबदारी काय आणि कर्तव्ये काय आहेत हे कळावे यासाठीही नियम तयार करावे लागतात. उदाहरणार्थ पोस्ट ऑफिसमधून पोस्टमनला काही पत्रे आणि विभाग नेमून दिले जातात. त्याप्रमाणे तो योग्य घरी पत्र पोहोचवण्याचे काम करतो. त्यामुळे आपल्या नावाचे पत्र आपल्या घराच्या पत्त्यावर न चुकता येते. आपला पोस्टावरील विश्वास वाढतो. म्हणजेच नियमाचे पालन केले की व्यवहारात शिस्त येते. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करतो. म्हणूनच नियम सर्वांसाठी असतात.