नियम सर्वांसाठी

पर्यावरण रक्षण

views

3:34
समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी विविध कायदे करण्यात आले आहेत. समाजाप्रमाणे निसर्ग हा देखील आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश जगातील प्रत्येकाच्या मनात पर्यावरणाविषयी जागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणे असा आहे. मुलांनो, जंगलतोड, शेतीत रासायनिक खतांचा अती वापर, जंगलतोड करून मोठ्या प्रमाणात केली जाणारी शेती, खाणकाम, मोठ्या प्रमाणात होणारी मासेमारी. या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होतो आहे. नद्यांमध्ये शहरातील सांडपाणी सोडल्यामुळे त्या प्रदूषित बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. प्रदूषणामुळे वातावरणात अचानक बदल होऊ लागले असून त्याचा परिणाम वेळीअवेळी पाऊस येण्यात व जल टंचाई होण्यात झाला आहे. वृक्षतोड आणि गवताचं आच्छादन नाहीसं झाल्यानं पावसाच्या पाण्याने माती वाहून जाऊ लागली आहे. जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतीसाठी पाणी मिळेनासे झाले आहे. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते. आपण अशाच वेगाने नैसर्गिक संपत्तीचा वापर करत राहिलो तर आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांना नैसर्गिक संपत्ती पुरणार नाही. नैसर्गिक संपत्ती येणाऱ्या पिढ्यांनाही पुरावी यासाठी आपण या संपत्तीचे जतन केले पाहिजे. ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. म्हणूनच पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम, कायद्यांची गरज आहे. जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावररक्षणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.