नियम सर्वांसाठी

नियम व अटी

views

2:47
१)सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री दहा वाजल्यानंतर बंदी करणे: या नियमातून ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हा हेतू साध्य होतो. २)मुलां-मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण देणे: या नियमाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार सर्वांसाठी प्राप्त होऊन तळागाळापर्यंत प्राथमिक शिक्षण पोहोचते. ३)निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी घालणे: या नियमामुळे नद्यांची स्वच्छता राखून त्यांचे प्रदूषणापासून संरक्षण केले जाते. ४)कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण देणे: स्त्रियांवरील अत्याचाराला आळा घालणे हाच यामागील हेतू आहे. ५)बाल कामगारांच्या नेमणुकीवर बंदी आणणे: या नियमातून मुलांचे शोषण थांबवणे व त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा हेतू साध्य होतो. ६)जंगलतोड व शिकारीवर बंदी घालणे: या नियमाने नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण केले जाते. पाहिलंत, अशा प्रकारे प्रत्येक सामाजिक नियम करण्यामागे काहीतरी हेतू असतोच. काही नियमांच्या मागे अनेक हेतू असतात. ते हेतू साध्य व्हावेत म्हणूनच नियम करण्यात आले असतात.