हवा

करून पहा - 1

views

3:27
आपल्या सभोवतालची हवा कुठपर्यंत पसरली आहे हे माहीत आहे का तुम्हाला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण एक प्रयोग करू. प्रथम आपण ही महिनाभराची वर्तमानपत्रांची रद्दी घेऊ. त्यातील प्रत्येक पान फाडून त्याचे चार भाग करू. आता ही पाने फरशीवर एकावर एक ठेवू. मुलांनो, मी कागदावर कागद ठेवत असताना तुम्ही फरशीलगतच्या म्हणजे खालच्या पानांचेही निरीक्षण करा. तसेच वरच्या पानांचेही निरीक्षण करा. आणि खालच्या व वरच्या कागदांच्या थरांमध्ये काय फरक होत जातो त्याकडे लक्ष द्या. मुलांनो आता आपले सर्व कागद ठेवून झाले आहेत. आता आपण कागदाच्या चळतीचे निरीक्षण करू आणि वरच्या व खालच्या थरांमध्ये काय फरक दिसतो ते पाहू