हवा

करून पहा - 2

views

1:49
प्रथम एक बशीसारखे खोलगट भांडे घेऊ. त्यात एक पेटवलेली मेणबत्ती उभी करून ठेवू. नंतर बशीत पाणी भरू. मुलांनो बघा मेणबत्ती व्यवस्थित पेटलेली दिसते आहे. आता मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास उपडा ठेवू. काय झाले सांगा? ग्लास मेणबत्तीवर उघडा ठेवल्यानंतर थोड्याच वेळात मेणबत्ती विझली आणि ग्लासच्या आत पाण्याची पातळी वाढली. हवेतील एक घटक ज्वलनाला म्हणजे जळण्यासाठी मदत करतो. ग्लासमधील हवेत तो घटक होता. तो जसजसा वापरला गेला तसतसे पाणी वर चढत गेले. हवेतील तो घटक संपला. त्यामुळे मेणबत्ती विझली. पाणी वर चढणे थांबले. ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू असे म्हणतात.डोळ्यांना जरी भांडे रिकामे दिसत असले तरीही त्यात हवा असते. तशीच हवा या प्रयोगातील काचेच्या ग्लासमध्ये होती. या हवेतही ऑक्सिजन वायू होता. हवेतील ऑक्सिजन संपताच ती मेणबत्ती विझली. आणि त्या ऑक्सिजनची रिकामी झालेली जागा पाण्याने व्यापली. त्यातील ऑक्सिजन वायू संपल्याने मेणबत्ती विझली. ग्लासमधील जागा मोकळी होण्याचे बंद झाल्याने पाणी वर चढणेही थांबले.