हवा

हवेतील विविध वायू

views

4:19
पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहेऑक्सिजन वायूलाच प्राणवायू असेही म्हणतात. कारण आपण श्वासोच्छवासासाठी त्याचाच वापर करतो. हवेत ऑक्सिजनशिवाय इतरही वायू असतात. हवेत ऑक्सिजन सोडून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड यांसारखे वायू असतात. श्वसन म्हणजेच श्वास घेण्यासाठी आणि ज्वलन म्हणजे वस्तू जाळण्यासाठी ऑक्सिजन वायू वापरला जातो.गाड्यांच्या चाकांतही हवा भरतात. वनस्पती श्वसन करताना हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू आत घेतात. माशांना पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजन वायूचा श्वसनासाठी उपयोग होतो.सोडावॉटरची बाटली ती फोडल्यानंतर फुसफुस करत त्यातील हवा एकदम बाहेर पडते. हे असे का होते? तर त्या बाटलीत कार्बन डायऑक्साइड हा वायू दाब देऊन भरलेला असतो. ज्यावेळी आपण झाकण उघडतो, त्यावेळी कार्बन डायऑक्साइड वायूवरील दाब कमी होऊन तो एकदम बाहेर पडतो. कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात हवेतही असतो. वनस्पती सूर्यप्रकाशात हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात. वनस्पती अन्न तयार करताना हवेतील कार्बन डायऑक्साइडचा वापर करतात. म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू वनस्पतींना उपयोगी पडतो.