इतिहास म्हणजे काय?

प्रस्तावना

views

2:41
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या ह्या गोष्टी पूर्वी होऊन गेलेल्या आहेत. चारशे वर्षांपूर्वी झालेल्या आहेत. ह्याला आपण चारशे वर्षांपूर्वीचा काळ म्हणजेच होऊन गेलेला काळ, भूतकाळ असेही म्हणतो. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास होय.आपण काल, आज, उद्या असे म्हणतो. मग आता मला सांगा काळ किती आहेत? १)वर्तमान काळ २)भूतकाळ ३)भविष्यकाळ असे काळाचे ३ प्रकार पडतात. आपण जन्म घेतो तेव्हापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला, म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ होय. 'भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला 'इतिहास' म्हणतात.