इतिहास म्हणजे काय?

इतिहास आणि आपण

views

3:15
आपण शास्त्र म्हणजे काय? ते पाहिले आहे. शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. आपल्या अवतीभवती जो परिसर आहे. म्हणजेच नदी, पर्वत, समुद्र, झाडे, मैदाने इत्यादी. त्याचा मानव आपल्या रोजच्या जीवनात उपयोग करून घेतो. जर परिसराला हानी पोहोचली तर कोणते अपाय होतील ह्याचा अभ्यास आपण पर्यावरणशास्त्रात करतो. तसेच इतिहासात भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. रोजच्या जीवनात आपण जी कृती करतो त्याचा परिणाम समाजात चांगला, किंवा वाईट होत असतो. त्याचा परिणाम मानवाच्या दैनंदिन जीवनावर होतो. गावातील लोक एकत्र येऊन समाजाच्या उपयोगी काम करत असतील तर त्या गावाचा विकास होईल. पण जर गावात समाजविघातक लोक असतील तर त्या गावाचा विकास होणार नाही. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतीचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी काय चांगले आणि काय वाईट यांचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमानकाळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल, हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते.