इतिहास म्हणजे काय?

भूतकाळ आणि भविष्यकाळ

views

2:04
भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. उदा. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारशी लढा दिला. त्यामुळे भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिलाम्हणजे सावित्रीबाई होत्या. तसेच स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. भूतकाळात झालेल्या त्यांच्या या कार्यामुळेच आज भारतात स्त्री शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा अनेक घटना ह्या पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. उदा. पूर्वी अश्मयुगीन मानवाने दगडावर दगड घासला व ठिणगी पडली. त्यातून अग्नीचा शोध लागला. मानवाने त्यात प्रगती करून चुलीवर अन्न शिजवण्याची कला प्राप्त केली. नंतर गॅसवर अन्न शिजवू लागले. तसेच चाकाचा शोध मानवाने लावला. मग चाकाचा वापर करून वाहने तयार केली. पूर्वी जे शोध लागले त्यात पुढच्या पिढ्यांनी भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले. पूर्वीच्या संगणकात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते.