शाब्दिक उदाहरणे बेरीज,वजाबाकी

बेरीज व वजाबाकी : मिश्र उदाहरणे

views

3:53
बेरीज व वजाबाकी : मिश्र उदाहरणे. मुलांनो आता आपण बेरीज व वजाबाकीची मिश्र उदाहरणे सोडवूया. मिश्र उदाहरणे म्हणजे एकाच उदाहरणात आपल्याला बेरीज व वजाबाकी या दोन्हीही क्रिया करायच्या असतात. चला तर मग करूया सुरवात. उदा.१) एका जंगलात एकूण ४२३०६ झाडे आहेत. त्यापैकी २३४७९ झाडे सागवानाची, १६६७५ झाडे सुबाभळीची व बाकीची इतर झाडे आहेत. तर त्या जंगलात इतर झाडे किती आहेत? पहा, मुलांनो: या उदाहरणात जंगलात असणाऱ्या एकूण झाडांची संख्या दिली आहे. शिवाय सागवान, सुबाभूळ या झाडांची वेगवेगळी संख्या दिली आहे. आणि या दोन झाडांव्यतिरिक्त इतरही काही झाडे जंगलात आहेत. मग ही इतर झाडे नेमकी किती आहेत ते आपल्याला काढायचे आहे. हे काढण्यासाठी सागवान व सुबाभूळ या झाडांची संख्या माहीत असल्याने प्रथम त्यांची बेरीज करून घेऊया. त्यांच्या बेरजेची जी संख्या येईल, ती संख्या एकूण झाडांतून वजा करूया. म्हणजे आपल्याला इतर प्रकारच्या झाडांची संख्या मिळेल. म्हणजेच सर्वप्रथम येथे आपल्याला बेरीज व नंतर वजाबाकी ही क्रिया करावी लागेल.