शाब्दिक उदाहरणे बेरीज,वजाबाकी

सरावासाठी उदाहरण

views

3:41
सरावासाठी उदाहरण: मुलांनो, आता आपण सरावासाठी आणखी एक उदाहरण सोडवूया. उदा.: एका रोपवाटिकेत ३२१४० रोपे तयार करण्यात आली. त्यापैकी १२७८९ आंब्याची रोपे, १०४२३ सागवानाची रोपे व बाकीची इतर प्रकारची रोपे होती. तर इतर प्रकारची रोपे किती होती? शि: सांगा, मुलांनो या उदाहरणात काय दिले आहे? वि: बाई एकूण रोपे ३२१४०, त्यातील १२७८९ आंब्यांची रोपे आणि १०४२३ सागवानांची रोपे दिली आहेत. शि: बरोबर मग हे गणित सोडवण्यासाठी प्रथम कोणती क्रिया कराल? वि: प्रथम आंब्यांची व सागवानाच्या रोपांची बेरीज करू. शि: शाब्बास! मग करा सुरवात.