शाब्दिक उदाहरणे बेरीज,वजाबाकी

वजाबाकी उदाहरण 2

views

3:10
वजाबाकी उदाहरण 2: दोन संख्याची बेरीज ३१४२६ आहे. त्यापैकी एक संख्या १७५४८ आहे तर दुसरी संख्या कोणती? पहा, मुलांनो: या उदाहरणात दोन संख्याची एकूण बेरीज दिली आहे. आणि त्यातील एक संख्या दिली आहे व दुसरी संख्या काढायची आहे. मग ही संख्या कशी काढणार बरं? तर एकूण बेरजेतून दिलेली एक संख्या वजा केली असता आपल्याला दुसरी संख्या मिळणार आहे. या उदाहरणात दिलेली माहिती आहे: २ संख्यांची बेरीज ३१४२६ व त्यातील एक संख्या १७५४८ असून आपल्याला दुसरी संख्या कोणती हे काढायचे आहे. म्हणून हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण वजाबाकीची क्रिया करू. पहा ६ एककातून ८ एकक वजा होत नाहीत. म्हणून २ दशकातून १ दशक एककात सुट्टा करून घेतला. त्यामुळे दशकात १ दशक शिल्लक राहिला आणि एककात १६ एकक झाले. आता या १६ एककातून ८ एकक वजा केले तर ८ एकक शिल्लक राहिले. १ दशकामधून ४ दशक वजा होत नाहीत. म्हणून ४ शतकातून १ शतक दशकात देऊ. आता शतकात ३ शतक उरतील व दशकात ११ दशक तयार होतील. ११ दशकातून ४ दशक वजा केले तर ७ दशक शिल्लक राहिले. ३ शतक मधून ५ शतक वजा होत नाहीत. म्हणून हजारातून १ हजार शतकाच्या घरात घेऊ. आता हजारस्थानी शून्य राहतील व शतकात १३ शतक तयार होतील. १३ शतकातून ५ शतक वजा केले तर ८ शतक शिल्लक राहिले. आता हजारातील ० मधून ७ वजा होत नाहीत. म्हणून दशहजारातील ३ मधून १ हजाराला देऊ. हजाराच्या घरात १० तयार झाले. आणि दशहजारात २ उरले. १० हजारातून ७ हजार वजा केले तर ३ हजार शिल्लक राहिले. आता २ दशहजारातून १ दशहजार वजा केला तर १ दशहजार शिल्लक राहिले. म्हणून १३८७८ ही दुसरी संख्या असेल.