गड आला, पण सिंह गेला Go Back आधी लग्न कोंढाण्याचे views 3:10 तानाजी मालुसरे यांचा एकुलता एक मुलगा रायबा याचे लग्न चार दिवसांवर येऊन ठेपले होते. तानाजीच्या घरी लग्नाची जोरात तयारी सुरु होती. त्यावेळी तानाजीला वाटले, महाराज आणि मासाहेब म्हणजे जिजामाता या दोघांना लग्नाला बोलवावे. ते शेलारमामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आले. शेलारमामांनी शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. आमंत्रण ऐकताच शिवराय शेलारमामांना म्हणाले, “शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही काही या लग्नाला हजर राहू शकणार नाही. आम्ही मुघलांच्या ताब्यात असलेला कोंढाणा परत मिळविण्यासाठी कोंढाण्याच्या मोहिमेवर स्वत: जाणार आहोत.” शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, “महाराज हा तानाजी जिवंत असताना असल्या जीवघेण्या मोहिमेवर आपण जाणार? मग आम्ही कशासाठी आहोत? ते काही नाही! रायबाचे लग्न तर कोंढाणा ताब्यात घेतल्यानंतरही होईल. आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. कोंढाणा जिंकण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद दया.” असे म्हणून तानाजीने जिजामाता व शिवरायांचे आशीर्वाद घेतले. प्रस्तावना आधी लग्न कोंढाण्याचे कडयावरून गडावर गड आला, पण सिंह गेला