गड आला, पण सिंह गेला Go Back कडयावरून गडावर views 3:14 ती भयाण काळोख्या रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावळे कडयाच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. सगळीकडे शांतता पसरली होती. कडयावरती एकदम सर्वांना चढता येणार नव्हते. त्या तीनशे मावळयातील पाच – सहा तरूण, चपळ काटक मावळे पुढे आले. त्यांनी कडा चढून जाण्याचे ठरविले. हा कडा चढणे म्हणजे सोपे काम नव्हते. पण तरीही महाराजांच्या या शूर मावळ्यांनी धाडस केले. कधी खडकातील पुढे आलेल्या भागाला धरत तर कधी कोठे दगडांच्या फटीत बोटे घालून मोठया हिमतीने कडा चढून ते सर्वजण गडावर गेले. वर जाताच त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या दोरीचे एक टोक झाडाला घट्ट बांधले. दुसरे टोक गडाच्या पायथ्याला असलेल्या मावळयांकडे फेकले. मग काय? तानाजी व त्याच्या मावळयांना हा तर राष्ट्रीय महामार्गाच वाटला. त्यांनी सरासर दोरावरून एखादया वानरासारखे वर जायला सुरुवात केली. प्रस्तावना आधी लग्न कोंढाण्याचे कडयावरून गडावर गड आला, पण सिंह गेला