वाहतूक व संदेशवहन

काय करावे बरे

views

5:31
सांगा पाहू (संदेशवहन):- मुलांनो आतापर्यंत आपण वाहतूक व वाहतुकीच्या साधनांची माहिती घेतली. आता आपण संदेशवहनाची माहिती घेऊ. त्यासाठी आपण प्रथम संदेशवहन म्हणजे काय? ते समजून घेऊ. संदेशवहन म्हणजे माहितीची देवाण – घेवाण होय. मुलांनो, तुम्हांला समोर जी चित्रे दिसत आहेत, त्यात संदेशवहनाची साधने दिली आहेत. यात अगदी पूर्वीपासून ते अत्याधुनिक काळातील संदेशवहनाची साधने दिली आहेत. “विविध प्रकारची माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवणे म्हणजे संदेशवहन होय”. मुलांनो फार वर्षांपूर्वी संदेश पाठविण्यासाठी कबुतरांचा वापर केला जात असे. कबुतराच्या पायाला निरोप किंवा संदेश लिहिलेली चिठ्ठी बांधली जात असे. अशा कबुतरांना आधी प्रशिक्षण दिले जात असे. ते कबुतर जिथे ती चिठ्ठी पोहचवायची असेल तेथे ती पोहचवत असत. तसेच एखादया घरात जर दु:खद बातमी घडली असली तर ती बातमी त्या दुसऱ्या गावातील त्या व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविण्यासाठी एखादी व्यक्ती पाठविली जात असे. त्याला निरोप्या असे म्हणत.